
सामना ऑनलाईन, ठाणे
शुक्रवारी रात्री 10 वाजल्यापासून वांगणी स्थानकाजवळ अडकलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसमधील प्रवाशांची सुटका करण्यात बऱ्याच अडचणी येत आहेत. एनडीआरएफने या प्रवाशांना सोडवण्यासाठी बोटीने ट्रेनपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, मात्र पावसाचा मारा आणि पाण्याच्या प्रवाहाचा वेग यामुळे त्यांना बोटी स्थिर ठेवता येत नाहीयेत. त्यातच ही एक्सप्रेस जिथे उभी आहे तिथून वाहणाऱ्या उल्हास नदीला भरती आल्याने पाण्याची पातळी वाढली आहे.
एक्सप्रेसच्या आजूबाजूला 8 फूट पाणी आहे. या प्रवाशांना वाचवण्यासाठी हवाई मार्गाचा वापर करून त्यांना एअरलिफ्ट केलं जाण्याची शक्यता आहे. आरपीएफचे अधिकारी आणि जवान हे महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये पोहोचले असून त्यांनी सगळ्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्याचे आश्वासन दिले आहे.
#MumbaiRains #MahalaxmiExpress वांगणी स्थानकाजवळ अडकलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसमधील प्रवाशांना एअरलिफ्ट करण्याची नौदल आणि हवाई दलाला विनंती pic.twitter.com/MdCazcAlYb
— Saamana (@Saamanaonline) July 27, 2019
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी मात्र या प्रवाशांना बोटीने किंवा हवाईमार्गाने सुरक्षित स्थळी नेणार नसून ही ट्रेन जवळच्या स्थानकात पोहचवण्याचा प्रयत्न केला जाईल असं सांगितलं आहे. या सगळ्या प्रवाशांची बदलापूर स्थानकात व्यवस्था करण्यात येणार असून तिथून या प्रवाशांना कोल्हापूरला पोहचवण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
RPF and City Police in stranded Mahalaxmi Express assuring the passengers in coach#MumbaiRainsLiveUpdates @drmmumbaicr pic.twitter.com/lXAJV09APl
— Central Railway (@Central_Railway) July 27, 2019
या गाडीमध्ये खायला प्यायला काहीच उरलेलं नाहीये. गाडीत 1000 पेक्षा जास्त प्रवासी असून खाणं-पिणं सगळं संपल्याने त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. लहान मुलं,महिला आणि वृद्धांचे विशेष करून हाल होत आहेत. आपली लवकरात लवकर सुटका व्हावी अशी प्रार्थना हे प्रवासी करत आहेत.

























































