पुलगाव दारुगोळा भांडारातील स्फोटातील मृतांची संख्या वाढली, 6 ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pulgaon-blast

सामना प्रतिनिधी । वर्धा

वर्धा जिल्ह्यातील पुलगाव जवळील काही अंतरावर असलेल्या लष्कर तळाच्या परिसरात आज सकाळी 7:10 वाजताच्या सुमारास बॉम्ब निकामी करते वेळस मोठा स्फोट घडला असून, त्यात सहा जणांचा मृत्यू तर 11 मजुर गंभीर जखमी झाले असल्याची घटना घडली आहे.

वर्धा जिल्ह्यातील पुलगाव जवळच्या अंतरावर असलेल्या सिएडी दारुगोळा भांडार लष्कर तळाच्या परिसरात जुने स्फोटक बॉम्ब निकामी करण्याचे कंत्राट सिएडी मधील अधिकाऱ्यांनी मध्य प्रदेशातील जबलपूर येथील खमरिया ऑर्डीनन्स फॅक्टरी ला काम दिले होते. जबलपूर येथील कंपनी ने पुलगाव येथील असलेले शंकर चांडक यांना बॉम्ब निकामी करण्याचे काम देण्यात आले होते. चांडक यांनी बॉम्ब निकामी करण्यासाठी परिसरातील सोनेगाव व केळापुर या गावातील नागरिकांना कामावर घेतले होते. जुने बॉम्ब स्फोटके नष्ट करण्यासाठी 100 कामगारांचा समावेश करण्यात आला होता.

भांडाराच्या लष्कर परिसरात असलेल्या सोनेगाव गावा जवळ खाजगी कंपनी मधील कर्मचारी व अधिकारी जुने स्फोटके बॉम्ब निकामी करते वेळेस बॉम्बची पेटी खाली पडल्याने हा भीषण स्फोट आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी सकळी 7 वाजताच्या सुमारास घडला असून, त्या स्फोटात सोनेगाव (आबाजी) व केळापुर येथील कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सहा जणांचा मृत्यू झाला तर दहा कर्मचारी गंभीर जखमी झाले आहे. या भीषण स्फोटाकाचा आवाज 500 मिटर पर्यंत ऐकायला आला असल्याचे गावकऱ्यांकडून सांगितले जात आहे.

आज सकाळी 7 वाजताच्या सुमारास जुने स्फोटके बॉम्ब निकामी करते वेळेस या भीषण स्फोट झाला त्यामध्ये नारायण शामराव पाचारे वय 55 वर्ष रा. सोनेगाव आबाजी, विलास लक्ष्मण पचारे वय 40 वर्ष रा. सोनेगाव आबाजी, प्रभाकर रामदास वानखेडे वय 40 वर्ष रा. सोनेगाव आबाजी , राजकुमार राहुल भोवते वय 23 वर्ष रा. केळापुर, प्रवीण प्रकाश मुंजेवार वय 25 वर्ष रा. केळापुर व डेपो कर्मचारी उदय विरसिंग वय 38 वर्ष रा. सबलपूर यांचा समावेश आहे. तर दहा जण गंभीर जखमी झाले असून, यात ईसराईल मोहम्मद शाह, मनोज रामदास सयाम, प्रशांत हरिभाऊ मडावी, रुपराव श्रीराम नैताम, संदीप शंकर पचारे, विकास शेषराव बेलसरे, दिलीप निमगडे, प्रशांत मुंजेवार, प्रवीण श्रीरामे, मनोज मोरे यांचा समावेश असल्यामुळे त्यांना सावंगी मेघे येथील असलेल्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू आहे. यात दोघांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहे.

पुलगाव येथील कंत्राटदार शंकर चांडक व त्यांचा भाऊ अशोक चांडक हा भीषण स्फोट घडते वेळेस फरार झाले असल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.

सोनेगाव व केळापुर या गावातील नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे गावकऱ्यांनी कंत्राटदारावर गंभीर आरोप केले आहे. गावातील नागरिकांचा दुर्दैवि मृत्यू झाला असल्यामुळे त्यांना प्रत्येकी 20 लाखांची मदत द्यावी अशी मागणी यावेळी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे. शंकर चांडक हा कमी पैसे देऊन कामगारांकडून काम करुन घेत असून, दुःखपत झाल्यास कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत देत नसून,पिळवणूक करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी रुग्णालयात जाऊन केली जखमी मजुरांची पाहणी मुख्यमंत्री निधीतून मृतक व जखमींना तात्काळ मदत जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

दोन वर्षांपूर्वी घडला होता भीषण स्फोट; 20 जवानांचा दुर्देवी झाला होता मृत्यू

* या आधी दिनांक 1 जून 2016 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पुलगाव येथील सिएडी दारुगोळा भांडारामध्ये भीषण स्फोट झाला होता. त्यात 3 अधिकारी तर 17 जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या घटने मधून बाहेर पडताच आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास बॉम्ब निकामी करण्याचे काम सुरु असते वेळेस बॉम्बची पेटी खाली पडण्यात त्यात हा भीषण स्फोट घडला आहे. या स्फोटामध्ये सुध्दा सहा कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

* रॉबटच्या माध्यमातून निकामी बॉम्ब नष्ट केले असते तर जीवितहानी झाली नसती

पुलगाव येथील सिएडी कॅम्प मध्ये निकामी असलेले बॉम्ब नष्ट करतांना काळजीपूर्वक बॉम्ब नष्ट करायला हवे होते. रॉबट च्या माध्यमातून स्फोटके निकामी केले असते तर मोठी जीवितहानी झाली नसती
– हेमंत महाजन निवृत्त ब्रिगेडर

* दोन तासानंतर जखमीवर करण्यात आला उपचार

सकाळी 7 वाजताच्या सुमारास पुलगाव येथे भीषण स्फोट झाला त्या स्फोटात दहा मजूर वर्ग गंभीर जखमी झाल्याने, त्यांना सावंगी मेघे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता, त्यांच्यावर दोन तासानंतर उपचार करण्यात आला असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चारुताई टोकस यांनी यावेळी केला आहे.

* जखमींवर वेळेत उपचार- डॉ. बोरले नातेवाईकांचे सांत्वन करण्याऐवजी राजकारण केले जात आहे – दत्ता मेघे

सिएडी पुलगाव कॅम्प येथे सकाळी घडलेल्या भीषण स्फोट झाला. त्यात जखमींना रुग्णालयात घेऊन येताच डॉक्टरांनी एकच गर्दी केली होती. जखमींवर वेळेत उपचार करण्यात सुरुवात करण्यात आली होती. मला घटनेची माहिती मिळताच मी रुग्णालयात दाखल झालो. व स्फोटात गंभीर जखमी झालेल्या आठ मजूर वर्गावर उपचार सुरू करण्यात आले तर दोघांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्या दोघांवर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरु करण्यात आले असल्याची माहिती डॉ. राजीव बोरले यांनी दिली आहे.

माझ्या कडून जखमींच्या नातेवाईकांचे सांत्वन करण्यात आले. माझ्यावर व रुग्णालयातील डॉक्टरांवर केलेला आरोप हा बिनबुडाचा असून,यात राजकारण करू नये असे माजी खासदार दत्ता मेघे यांनी सांगितले आहे.