शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनानिमित्त विविध कार्यक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त वरळीतील गांधीनगरमधील शिवस्मृती को-ऑप. हाऊसिंग लि. साई गणेश मंदिरात रविवार, 22 जानेवारीला दुपारी 2 वाजता चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गट 1 – नर्सरी, छोटा शिशू आणि मोठा शिशू, गट 2 – पहिली ते तिसरी, गट 3 – चौथी ते सहावी आणि गट 4 – सातवी ते दहावी असे आहे. नोंदणी स्पर्धेच्या वेळी केली जाणार आहे तसेच विभागातील महिलांसाठी रविवार, 22 जानेवारीला हळदी-पुंकू समारंभ आयोजन करण्यात आला आहे. सोमवार, 23 जानेवारीला अंध कलाकारांच्या संगीत सरगम म्युझिकल ग्रुपची संगीत मैफल होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता बक्षीस वितरण सोहळा सुरू होणार आहे, अशी माहिती उपशाखाप्रमुख दीनानाथ चौगुले यांनी दिली.