वसईत कॉस पॉवर कंपनीत बॉयलरचा स्फोट; तीन कामगारांचा मृत्यू, सात जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वसई येथील कॉस पॉवर कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन झालेल्या भीषण दुर्घटनेत तीन कामगार ठार झाले आहेत. या स्फोटामुळे सात जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.