विलेपार्त्यात आज ‘वसंत बहार’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रख्यात संगीतकार वसंत पवार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने उद्या ‘वसंत बहार’ हा सांगीतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात रात्री ८.३० वाजता ही सुरेल मैफल रंगणार आहे.
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशीष शेलार यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होत आहे. संगीतकार वसंत पवार यांच्यासोबतच वसंत प्रभू आणि वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेली गीतेही यावेळी सादर केली जाणार आहेत. गायिका केतकी भावे-जोशी, श्रद्धा वेटे आणि नचिकेत देसाई हे गाणी सादर करतील. संगीत संयोजन प्रशांत लळित यांचे असून निवेदन अनघा मोडक या करतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी दिली.