
वासिंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत वासिंद पासून दोन किलोमीटर अंतरावरील वेहळोली येथील कृष्णा प्रोमोशन या प्लास्टिकचे साहित्य बनवणाऱ्या कंपनीला आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीची तीव्रता इतकी भयानक होती की, या आगीच्या धुराचे लोळ वासिंद व परिसरात पसरले होते.
सुमारे 4 एकर मध्ये पसरलेल्या या कंपनीमध्ये 500 च्यावर कामगार काम करत आहेत. ‘केडिएमसी’च्या दोन व भिवंडी मनपाच्या दोन अशा घटनास्थळी अग्नीशमन दलाचे चार गाड्या अथक परिश्रम घेत आग विझवण्याचे काम करत आहेत.
घटनास्थळी शिवसेना माजी आमदार पांडुरंग बरोरा, तालुका संपर्क प्रमुख ज्ञानेश्वर तळपाडे, वासिंद पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे, एपिआय जाधव व स्टाफ, शहापूर पिएसआय कदम, एमएसईबीचे सहाय्यक अभियंता अमोल बिरे हे उपस्थित होते.
































































