लोकोधारार्थ स्वामी महाराजांनी आसेतु हिमाचल पायी प्रवास केला!

>> निळकंठ कुलकर्णी ([email protected])

।। श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज ।।

श्री वासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराज हे पराकोटीचे दत्तोपासक आणि दत्तभक्त होते त्यांचे संपूर्ण जीवन हे दत्तमय आणि दत्त आज्ञेत होते दत्त महाराजांची आज्ञा झाल्याशिवाय ते कुठलेही कार्य करत नसत आणि यदा कदा दत्तात्रेयांच्या आज्ञेचं उल्लंघन झालेच तर तात्काळ त्याची प्रचिती आल्याशिवाय राहत नसे. स्वामी महाराज संपूर्ण दत्तमय होते. ही भक्तीची सगळ्यात सर्वश्रेष्ठ अवस्था आहे जिथे भक्त आणि भगवंत यात काही अंतर राहत नाही. म्हणूनच स्वामी महाराज साक्षत दत्तस्वरूपच आहेत.

प.पू. श्री वासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराज एकदा हिमालयाच्या एका तळाच्या काठावरून जात असताना अचानक त्यांना त्या अर्थ बर्फाच्छादित हिमतळाच्या थरावर कंपने आढळली ती पाहून एका एकी स्वामी महाराज स्तब्ध झाले. हळूहळू ती कंपने वाढत गेली आणि थोड्याच वेळात त्या अर्ध बर्फाच्छादित जलाशयातून एक सिद्ध योगी वर आले आणि स्वामी महाराजांना पाहून त्यांनी नमस्कार केला आणि भाष्य केले की आम्ही अनेकानेक वर्षांपासून अगम्य अश्या ठिकाणी बसून तपस्या करीत आहोत. तरी सृष्टी मध्ये होणारे बदल आणि शक्तीची उलाढाल आम्हाला ज्ञात आहे. तसेच कलियुगातील अवधुतांचे साक्षात अवतारस्वरूप आपण प.पू .श्री वासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराज या नावाने आसेतु हिमाचल लोकोधारार्थ यती रुपात संचार करीत आहात. हे आम्हाला अंतरज्ञानाने कळले आहे. अशा परमहंस चिन्मय मूर्तीचे दर्शन झाले हे आमच्या तपाचरणाचे फळ आहे असे म्हणून त्या सिद्ध योग्याने पुनश्चः स्वामी महाराजांना वंदन केले.

स्वामी महाराजांनी नारायण असा आशीर्वाद दिला आणि ते योगी आपल्या तप:स्थानी तळाच्या आत पुन्हा तपश्चर्येत विलीन झाले आणि स्वामी महाराज तिथून निघून गेले .

आपली प्रतिक्रिया द्या