
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात झाडे, पशु-पक्ष्यांबरोबर पर्यटकांना लवकरच ब्रिटिशकालीन व्हिक्टोरिया बग्गीची सफर अनुभवता येणार आहे. लहानग्यांपासून मोठय़ांपर्यंत सगळ्यांनाच बग्गीतून बागेचा फेरफटका मारता येणार आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी रविवारी सहकुटुंब इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गीतून फेरफटका मारल्यानंतर याची माहिती दिली.
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात झाडे, पशु-पक्ष्यांबरोबर पर्यटकांना लवकरच ब्रिटिशकालीन व्हिक्टोरिया बग्गीची सफर अनुभवता येणार आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी रविवारी सहकुटुंब इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गीतून फेरफटका मारल्यानंतर याची माहिती दिली. pic.twitter.com/8SMnLW93YF
— Saamana (@SaamanaOnline) March 22, 2021
मुंबईतील पर्यटनाला चालना देतानाच पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी इलेक्ट्रिक गाडय़ांचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून घोडय़ांशिवाय इलेक्ट्रिक पद्धतीची ब्रिटिशकालीन व्हिक्टोरिया मुंबईत धावणार आहेत. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात मोठय़ा संख्येने पर्यटक येत असून पर्यटकांसाठी अशी बग्गी आणखी एक आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.
सगळ्यांसाठीच ही इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बग्गीला दोन्ही बाजूने दरवाजे बसवणे, उन्हाळ्यात त्रास होऊ नये म्हणून बग्गीवर आकर्षित छप्पर या सुविधा उपलब्ध करण्यात येणार असून लवकरच प्राणिसंग्रहालयात पर्यटकांच्या सेवेत ही इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गी दाखल होईल. –किशोरी पेडणेकर, महापौर






























































