श्रावण महिन्याच्या तोंडावर भाजीपाला स्वस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। हडोळती

हडोळती येथे मंगळवारी आठवडी बाजारामध्ये भाजी पाल्याची विक्रमी आवक वाढल्याने भाजीपाल्याचे दर गेल्या आठवडयाच्या तुलनेत निम्यावर आले आहेत . भाजीपाला स्वस्त झाला आहे. यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी मात्र पळाले आहे.

टॉमेटोची लागवड वाढल्याने टोमॅटोचे दर घसरले आहेत. गेल्या दोन आठवडयांपेक्षा दर एकदम कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला असून यात शेपूची जुडी १०ला २ नग ,मिरची १५ रुपये किलो आषाढी एकादशीला मिरचीचे दर ८० रुपये किलो होते. त्यामुळे पंधरा दिवसात मिरचीचे दर कोसळले. गेल्या आठवडया मध्ये टॉमेटो ४० रू किलो होते ते आता १०रु ला दोन किलो झाले आहेत . कोथिंबीरची १०ची जुडी १०ला ३ जुडी नग याप्रमाणे मिळत आहे . मेथी १० ला २ नग जुडी , शेपूची जुडी १०ला दोन , दोडका १०ला किलो, काकडी गेल्या पंधरवाड्यामध्ये १०ला पाव किलो होती ती आता १० ला किलो मिळत आहे .कारले ६०चे २०ला कीलो, भेडी ६० ची २० ला किलो , कोबी ६० ची २० ला की लो , बटाटा २० रु किलो वांग्याचे भाव स्थिर वाटत होते ४० रु किलो प्रमाणे वांगे विकत होते.

या परिसरामध्ये भाजीपाल्याचे उत्पादन वाढल्यामुळे याचा फायदा ग्राहकांना होत असून पूढील एक महीना ग्राहकांना स्वस्त भाजीपाला मिळेल असे भाजीपाला विक्रेते सांगत आहेत.

summary…vegetable get cheap