नगर जिल्हयातील सर्व भाजीपाला बाजार 3 मेपर्यंत बंदच राहणार

510

कोरोनाचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हयातील नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व भाजीपाला बाजार 3 मेपर्यंत बंद राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत. तसेच भाजीपाला विक्री करणाऱ्यांना फेरीवाले किंवा एखाद्या ठिकाणी बसून (फक्त एकाच भाजीपाला विकेत्यास गर्दी टाळून) परवानगी राहील. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी यापूर्वी जिल्ह्यातील सर्व भाजीपाला बाजार 30 एप्रिलपर्यंत बंद करण्याचा आदेश लागू करण्यात आला होता. मात्र, केंद्र शासनाने लॉकडाऊनचा कालावधी 3 मेपर्यंत वाढवला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर हे आदेश जारी करण्यात आले आहेत. कोणतीही व्यक्ती संस्था, संघटना यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या