नगर जिल्ह्यातील सर्व भाजीपाला बाजार 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार

722
file photo

कोरोनाचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नगर जिल्ह्यातील नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व भाजीपाला बाजार 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हे आदेश जारी केले आहेत. तसेच भाजीपाला विक्री करणाऱ्या लोकांना, फेरीद्वारे किंवा एखाद्या ठिकाणी बसून ( भाजीपाला विकेत्यास गर्दी टाळून ) परवानगी राहील.

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हयातील सर्व भाजीपाला बाजार 14 एप्रिलपर्यत भरवण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. राज्यातील लॉकडाऊन 30 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत वाढवण्यात आल्याने हे आदेश जारी करण्यात आले आहेत. कोणतीही व्यक्ती संस्था, संघटनांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या