अज्ञात वाहनाच्या धडकेने तरुणाचा अपघाती मृत्यू

483

अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री बाराच्या सुमारास आष्टी बेलगांव रोडवर घडली. अशोक बबन गावडे (30) असे या तरुणाचे नाव आहे.

अशोक गावडे हा तालुक्यातील खडकवाडी येथील राहणारा असून खासगी गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करून पत्नी मुलासोबत आष्टी येथे राहत होते. सोमवारी दुचाकी घेऊन आईला भेटण्यासाठी गावी गेल्यानंतर पुन्हा आष्टी कडे येत असताना अंधार झाला. बेलगांव परिसरात आले नंतर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची जोराची धडक बसल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक कैलास गुजर करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या