वेंगुर्ला शहरात आढळला कोरोनाचा रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वेंगुर्ला शहरातील भटवाडी येथील शासकीय गोदामातील ट्रकचालक कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. हा चालक मूळचा कोल्हापूरचा असून सध्या भटवाडी येथील काजू व्यावसायिकाच्या इमारतीच्या मागील भागात राहत होता. दोन दिवसांपूर्वी ताप आल्याने त्याला ग्रामीण रुग्णालय वेंगुर्ला येथे तपासणीसाठी गेला होता. तेथून त्याला जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

या चालकाचा स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य विभागाने त्या परिसराचा सव्र्हे केला आहे. या परिसरात राहणाNया दोन कुटुंबांतील सर्वांचे स्वॅब नमुने घेण्यात येणार असून या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या सर्व व्यक्तींची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे तसेच हा संपूर्ण परिसर नगर परिषदेमार्फत निर्जंतुकीकरण करण्यात आलेला आहे.

वेंगुर्ला शहरात पहिल्यांदा आढळलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा विचार करता कोरोना विषाणूचा प्रसार इतरत्र होऊ नये म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टीने दाभोली नाका येथे तात्पुरत्या स्वरूपात बसविण्यात आलेले मच्छीविव्रेâत्यांना उद्या 18 जुलैपासून गणेश चतुर्थीचा कालावधी संपेपर्यंत मांडवी रोड येथे बसवण्याचे नियोजन केले असून मच्छीविव्रेâत्यांनी मांडवी रोड येथे मच्छीविक्री करण्याचे आवाहन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी केले आहे.

सध्या हा रुग्ण जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे उपचार घेत असून लोकांनी घाबरू नये, परंतु नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी तसेच शासनाने नेमून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये. – दिलीप गिरप, नगराध्यक्ष