परळीतील समस्या तात्काळ सोडवा अन्यथा तीव्र आंदोलन, व्यंकटेश शिंदे यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ

शहरातील नागरिकांना नगर पालिकेच्या आळशी आणि भ्रष्ट कारभारामुळे पान्याचा तुटवडा,घाणीचे साम्राज्य या सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.या सर्व समस्या तात्काळ सोडवून जनतेला दिलासा द्या अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

भीषण दुष्काळ दुरु असताना नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी आणी मान्सून पूर्व स्वछता करण्यात यावी यासाठी वारंवार पाठपुरावा घेऊनही नगर परिषदेच्या सत्ता धाऱ्यांचा आळशी आणि भ्रष्ट कारभार यामुळे नागरिकांची मोठी हेळसांड होत आहे. पाण्यामुळे आजवर अंनेकांचे जीव गेले, अनेक ठिकाणी मोठ मोठे वाद झाले तरीही नगर परिषद धीम्या गतीने काम करत आहे या सर्व प्रकारास कंटाळून शिवसेना आंदोलनाच्या पवित्र्यात अली आहे, असून येत्या आठ दिवसात सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा, मान्सून पूर्व पूर्ण शहरातील नाल्यांची सफाई करण्यात यावी, गंगासागर नगर येथील 40 फुटी रोड कन्याशाळा रोडला जोडण्यात यावा, गंगासागर नगर येथील पिटीआर माफक विकास कर लावून उपलब्ध करून देन्यात यावे, बंद असलेले पथ दिवे तात्काळ सुरू करणे, ज्या नागरिकांच्या घरावरून विद्युत तारा गेल्या आहेत तिथे नवीन पोल उभे करून व्यावस्था करण्यात यावी हे सर्व कामे येत्या आठ दिवसात पूर्ण करण्यात यावे अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन करेल असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश यांनी दिला आहे.