नागेश, सानिकाने जिंकली मॅरेथॉन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वर्सोवा विधानसभा (शाखा क्र 59/60) व उपविभाग प्रमुख राजेश शेटये यांच्या वतीने विभागात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धांचा शेवट ‘मिनी मॅरेथॉन’ या स्पर्धेने झाला. सदर स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ परिवहनमंत्री ऍड. अनिल परब यांच्या हस्ते संपन्न झाला. पुरुष गटात प्रथम क्रमांक नागेश कारंडे व महिला गटात प्रथम क्रमांक सानिका पाटील यांनी पटकावला. या मॅरेथॉन स्पर्धेतील पुरुष व महिला या गटातील पहिल्या तीन विजेत्यांना रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले.

मिनी मॅरेथॉनला वेसावा देवाची वाडी येथून सकाळी 7.30 वाजता सुरुवात झाली व 8.15 वाजता लोखंडवाला बँक रोड येथे समाप्त झाली. 5 किमीच्या या मिनी मॅरेथॉन स्पर्धेत सुमारे 485 स्पर्धकांनी सहभाग घेतला. याप्रसंगी शिवसेना विधानसभा संघटक यशोधर फणसे, समन्वयक देवेंद्र आंबेरकर, उपविभागप्रमुख राजेश शेटये, प्रभाग क्रमांक 59 च्या शिवसेना नगरसेविका प्रतिमा खोपडे, शाखाप्रमुख सतीश परब, सिद्धेश चाचे, सुबोध चिटणीस, शाखा संघटक अश्विनी खानविलकर, आरोही ग्रुपचे देवांग पटेल, युवासेना विभाग अधिकारी मोहित पेडणेकर, युवती अधिकारी भाग्यश्री आभाळे तसेच विभागातील नागरिक व शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.