ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत संसर्ग झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

यासंबंधी दिलीप कुमार यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून माहिती देण्यात आली आहे. ‘छातीत संसर्ग झाल्याने त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती ट्वीटमधून देण्यात आली आहे. तसेच त्यांच्या चांगल्या प्रकृतिसाठी प्रार्थना करा’, असेही आवाहन करण्यात आले आहे.

दादासाहेब फाळके पुरस्कारप्राप्त बॉलिवूडचे ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांना गेल्या काही काळापासून विविध समस्यांनी ग्रासले आहे. यावर उपचार सुरू असून दरम्यानच्या काळात त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना डिस्चार्जही देण्यात आला. परंतु आता पुन्हा एकदा त्यांची प्रकृति बिघडली आहे.