
ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं शनिवारी मुंबईत निधन झालं. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संध्या या चित्रपट महर्षी व्ही. शांताराम यांच्या पत्नी होत्या. त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केलं होतं. ‘पिंजरा’ या चित्रपटामधील त्यांची भूमिका खूप गाजली होती.
‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आंखें बारह हाथ’, ‘नवरंग’, आणि ‘अमर भूपाली’ चित्रपटांमधील भुकांसाठी संध्या शांताराम यांची आज आठवण काढली जाते. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अनेक चाहते शोक व्यक्त करत आहेत.




























































