
पदार्थ बनवताना आणि सोबत खाताना टॉमेटॉ सॉस तोंडीला लावण्याचं प्रमाण बरंच वाढलं आहे. पिझ्झा, सँडविच, बर्गर, फ्रेंच फ्राईज असो किंवा नुसती चपाती, सॉस जोडीला असेल तर हे पदार्थ खाण्याची लज्जत वाढते. बाजारात सॉसचे अनेक ब्रँड उपलब्ध आहेत. या ब्रँडमध्ये एक नवा ब्रँड उतरण्यासाठी आणि आपली जागा निर्माण करण्यासाठी धडपड करताना दिसतोय. या प्रयत्नात या ब्रँडने घोषणा केली आहे की आमचा सॉस विकत घ्या, खाऊन बघा जर नाही आवडला तर आम्ही तो परत घेऊ आणि तुमचे पैसेही परत करू. मात्र त्यासाठी त्यांनी काही अटी घातल्या आहेत.
Veeba नावाच्या ब्रँडचा हा सॉस असून त्यांनी अनेक वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलंय की तुम्ही आमचा सॉस चाखून बघा. तुम्हाला सॉस नाही आवडला तर आम्ही तो परत घेऊ आणि पैसे परत करू. मात्र असं करण्यासाठी ज्या अटी घालण्यात आल्या आहेत त्या खालील प्रमाणे आहेत.
- सॉस विकत घेतलेल्या बिलाची कॉपी तुम्हाला सांभाळून ठेवावी लागणार आहे.
- सॉसच्या बाटलीच्या झाकणाचा फोटो काढावा लागणार आहे.
- बिल आणि झाकणाचा फोटो [email protected] या ईमेलवर आयडीवर पाठवावा लागेल
- तुम्ही जी बाटली विकत घेतलेली असेल त्यातला सॉस हा 75 टक्क्यांपेक्षा अधिक बाटलीत शिल्लक असेल तरच तुम्हाला पैसे परत मिळतील.
- 75 टक्क्यांपेक्षा कमी सॉस बाटलीत उरला असेल तर तुम्हाला पैसे परत मिळणार नाही.
- ही ऑफर फक्त बाटलीबंद सॉससाठीच लागू असणार आहे.
- पाऊचमधल्या सॉससाठी ही ऑफर लागू नसेल असं कंपनीने जाहीर केलं आहे.




























































