‘विको’चे संचालक सुमंत पेंढरकर यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध आयुर्वेदिक उत्पादन पंपनी ‘विको लॅबोरेटरीज’ला जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवून देणारे ज्येष्ठ उद्योगपती सुमंत पेंढरकर (82)यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे उद्योग, समाजकारण आणि आयुर्वेद क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. नागपूरच्या अंबाझरी घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी मृणालिनी, पुत्र देवेश, मुलगी माधवी, सून लीना पेंढरकर आणि आप्तस्वकीय असा मोठा परिवार आहे.

‘विको लॅबोरेटरीज’ पंपनीचे संचालक सुमंत पेंढरकर यांच्या पुशल नेतृत्वाखाली विकोने आयुर्वेदिक टूथपेस्ट, त्वचा निगा आणि विविध हर्बल उत्पादनांच्या माध्यमातून देशातच नव्हे तर जगभरातील बाजारपेठेत विश्वासार्ह स्थान निर्माण केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुमंत पेंढरकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. सुमंत पेंढरकर यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक कर्तृत्ववान आणि दूरदृष्टी असलेला उद्योगरत्न गमावला आहे, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी शोकसंवेदना व्यक्त केली.