मतदान करून परतताना देगलूरमध्ये उपसरपंचाचा नाल्यात बुडून मृत्यू

600
sunk_drawn_death_dead_pic

देगलूर तालुक्यातील तुपशेळगाव येथील उपसपंच मतदान करुन परत येत असताना गावाजवळच असलेला नाला पार करताना त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.

देगलूर तालुक्यातील तुपशेळगाव येथील उपसरपंच निवृत्ती नागोराव भोयावार हे मतदान करुन दुपारी वझरगा मार्ग देगलूरकडे येणार होते. मात्र, तुपशेळगावचा नाला पार करून ते येत असतानाच त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा नाल्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. सायंकाळी काही ग्रामस्थ याच नाल्यातून पाणी थोडे ओसरल्यावर वझरगा गावाकडे येत असताना त्यांना उपसरपंचाचा मृतदेह दिसून आला. याची माहिती ग्रामस्थांना कळताच त्यांनी मृतदेह बाहेर काढला. या घटनेमुळे ग्रामस्थांत शोककळा पसरली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या