
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज मैदान अर्थात शिवाजी पार्क येथे आयोजिण्यात आलेल्या कविता वाचनाच्या कार्यक्रमात छत्रपती संभाजी महाराजांवरील ‘छावा’ चित्रपटामुळे मराठी जनांमध्ये कौतुकाचा विषय ठरलेल्या अभिनेता विकी कौशल याने कुसुमाग्रजांची ‘कणा’ ही प्रसिद्ध कविता म्हणत रसिकांच्या मने जिंकली. मला सांगण्यात आले की तुला ‘कणा’ ही कविता सादर करायची आहे. कणा म्हणजे काय, असा प्रश्न मला पडला. त्यावर ‘स्पाईन’ असे उत्तर मिळाले. ‘छावा’ केल्यानंतर मला ‘कणा’चा अर्थ कळला, असे त्याने आवर्जून सांगितले. ‘मनसे’कडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.