Video- …जेव्हा कार्तिक आर्यन दीपिका पदुकोणला नाचायला शिकवतो

890

अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिच्या छपाक या चित्रपटात व्यग्र आहे. त्याखेरीज 83 या आगामी चित्रपटातही ती एका भूमिकेत दिसणार आहे. नुकतीच तिने आणि रणवीर सिंग याने आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवसही साजरा केला. आता दीपिका चक्क एअरपोर्टवर नाचताना दिसली आहे.

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या काही व्हिडीओंमध्ये दीपिका पदुकोण विमानतळावर नाचताना दिसत आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओत तिच्यासोबत कार्तिक आर्यनही दिसत आहे. तो तिला धीमे धीमे या गाण्यावरच्या स्टेप्स दाखवत आहे. काही काळापूर्वी दीपिकाने कार्तिकला या गाण्याच्या चॅलेंजविषयी विचारणा केली होती. या गाण्याचे स्टेप्स मला शिकवशील का, अशी विनंतीही दीपिकाने कार्तिकला केली होती.

या विनंतीला मान देत कार्तिकने तिला या गाण्याचे काही स्टेप्स तेही चक्क विमानतळावर शिकवले. ते पाहून तिथे उपस्थितांनी टाळ्या आणि शिट्ट्यांनी प्रतिसादही दिला. कार्तिक आर्यन आगामी पती, पत्नी और वो मध्ये दिसणार आहे. कार्तिकसोबत या चित्रपटात भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडेही दिसणार आहेत.

व्हिडीओ-


View this post on Instagram

Swift moves #dheemedheeme with #kartikaaryan and #deepikapadukone ❤❤❤

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

आपली प्रतिक्रिया द्या