मांजराला वाचवणाऱ्या महिलेच्या पायाला बसला अजगराचा विळखा! पुढे काय झालं? वाचा

अजगराचा विळखा हे शब्द उच्चारले तरी आपल्या अंगावर भीतीने सरसरून काटा उभा राहतो. कधी चुकून अजगराचा विळखा बसला तर भल्याभल्यांची पाचावर धारण बसते. असाच काहीसा प्रकार एका महिलेसोबत घडला आहे.

व्हिडीओ व्हायरल

ही घटना ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड इथली आहे. या घटनेचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत अजगराने एका महिलेच्या पायाला घट्ट विळखा घातल्याचं दिसत आहे.

काय झालं नेमकं

ही महिला तिच्या मांजरीला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. अजगराचं मुख्य लक्ष्य ही मांजर होती. पण महिला मध्ये पडली आणि तिने त्याचं लक्ष दुसरीकडे वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो तिच्या अंगलट आला.

दहा फुटांच्या त्या अजगराने महिलेच्या पायाला विळखा घातला. ही पकड इतकी मजबूत होती की महिलेने पोलिसांना पाचारण केलं. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतली.

या व्हिडीओमध्येही पोलीस कर्मचारी आणि ती महिला अजगराच्या विळख्यातून सुटायचा प्रयत्न करताना दिसत आहे. पोलिसांना आधी तो तिचाच अजगर असावा असं वाटलं. पण, तो तिचा नव्हता. अजगराच्या विळख्यामुळे भलेभले घाबरतात पण ही महिला घाबरली नाही. तिने त्याच्या विळख्यातून सुटका करून घेतली आणि त्या अजगराला सुखरूप जंगलात सोडलं.

पाहा हा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या