
हिंदुस्थानी वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान बनले आहेत. अवघ्या 42व्या वर्षी सुनक यांच्या हाती ब्रिटनचा कारभार आला आहे. ऋषी सुनक हे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे ते जावई आहेत.
लिझ ट्रस यांनी अवघ्या 45 दिवसांत पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर ब्रिटनचे राजकारण ढवळून निघाले. माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन, पेनी मॉर्डंट आणि ऋषी सुनक हे तिघे रिंगणात होते. मात्र, सत्ताधारी कंझरव्हेटिव्ह पक्षाच्या (हुजूर पक्ष) बहुतांशी खासदारांनी सुनक यांना पाठिंबा दिला. त्यामुळे जॉन्सन यांनी सुरुवातीला माघार घेतली. त्यानंतर स्थानिक वेळेनुसार दुपारी 2 पर्यंत पेनी मॉर्डंट यांनीही माघार घेतली. त्यानंतर ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान असतील अशी घोषणा हुजूर पक्षाने केली आहे.
ब्रिटिशांनी तब्बल 150 वर्षे हिंदुस्थानवर राज्य केले. त्याच ब्रिटिशांवर, गोऱया साहेबांवर आता हिंदुस्थानी वंशाच्या व्यक्तीचे राज्य आले आहे. ऋषी सुनक यांनी इतिहास रचला आहे. त्यामुळे हिंदुस्थानातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांचा काही महिन्यांपूर्वीचा एक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ऋषी सुनक हे लंडन येथे गोमातेची पूजा करताना दिसत आहे.
Britain’s prime ministerial candidate Rishi Sunak performs gau pooja in London.@RishiSunak #gaupooja #VibesofIndia pic.twitter.com/voD3USdF5W
— Vibes of India (@vibesofindia_) August 25, 2022




























































