ट्रेंड –  लाडक्या मित्राचं केळवण

लग्न म्हटलं की, केळवण आलंच. मुलीला किंवा जोडप्याला लग्नाआधी घरी बोलावून त्याचे अगदी थाटामाटात केळवण करण्यात येते. असा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये चक्क मित्रांनी लाडक्या मित्राचं केळवण केलंय. खूप वर्षे वाट पाहून मित्राला त्याच्या आयुष्याची खास जोडीदार मिळाली आहे याचा आनंद साजरा करण्यासाठी सगळे मित्र एकत्र जमले आहेत. कोणत्याही मैत्रिणीची किंवा आई, बहिणीची मदत न घेता सगळ्या मित्रांनी स्वतःच्या मेहनतीने वेगवेगळे पदार्थ बनवले आहेत. एकीकडे स्वयंपाक घरात जेवणाची तयारी, तर दुसरीकडे काही मित्र केळवणाची सजावट करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यानंतर सगळी तयारी झाल्यावर मित्राला पाटावर बसवून केळीच्या पानात पंचपक्वान्न वाढून ताटाभोवती फुलांच्या पाकळ्या ठेवून असे थाटामाटात केळवण साजरे केले.