
चंद्रपूर हा वनव्याप्त जिल्हा आहे. या जिल्ह्यात वन्यजीव समृद्धतेने नांदताहेत. या जंगलात घडणाऱ्या सूक्ष्म हालचालींची माहिती वनविभागाला मिळावी यासाठी काही खास ठिकाणी ‘ई-सर्वेलंस’ यंत्रणा उभारण्यात आली आहे.
जिल्ह्यातील बल्लारपूरच्या जंगलातील कारवा वनतळे हे असेच एक ठिकाण. या तळ्यावर एका हरणाची अजगराने केलेली शिकार कॅमेरात कैद झाली आहे. तळ्याच्या काठावर पाणी पिण्यासाठी आलेल्या हरणाच्या कळपातील एक हरिण सावज रुपात हेरून अजगराने त्याचा फडशा पाडला. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच घडलेल्या या घटनेने वन विश्वातील अनोखी घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. वनविश्वातील हालचाली कळाव्या यासाठी उभारण्यात आलेली ही यंत्रणा वन विभागासाठी सहाय्यभूत ठरली आहे.




























































