Video – शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा दुसरा टीझर आला, महाराष्ट्राची उत्सुकता शिगेला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेचा दसरा मेळावा 5 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 6.30 वाजता शिवतिर्थावर होणार आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू असतानाच आता या मेळाव्याचा दुसरा टीझर रिलीज करण्यात आला आहे. अंगावर रोमांच उभा करणारा हा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर काही मिनिटातच त्याला तुफान प्रतिसाद मिळाला आहे.

 

एक नेता, एक झेंडा, एक मैदान… शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा! स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ), दादर, 5 ऑक्टोबर 2022, सायं. 6.30 वा., असे या ट्विटमध्ये म्हणण्यात आले आहे.

30 सप्टेंबरला शिवसेनेतर्फे पहिला टिझर प्रदर्शित करण्यात आला होता. ‘निष्ठेचा सागर उसळणार… भगवा अटकेपार फडकणार… महाराष्ट्राची ताकद दिसणार…’ अशी वाक्य स्क्रीनवर झळकतात आणि मग ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो…’ असे अंगावर रोमांच उभे करणारे शब्द कानावर पडतात. शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याची भव्य परंपरा दाखवणारा टीझर रिलिज झाल्यानंतर त्याला तुफान प्रतिसाद मिळत आहे.