
ताडोबा व्याघ्र प्रकल्प सुरू झाल्याला दोन दिवस झालेत. या दोन्ही दिवसात वाघोबाने दर्शन दिले नाही. मात्र शनिवारची सकाळ पर्यटकांसाठी उत्साहवर्धक ठरली. सकाळच्या फेरीत पर्यटकांना अगदी रस्त्यावरच रुबाबदार वाघाचे दर्शन झाले.
पट्टेदार वाघ दिसणे म्हणजे पर्वणी. पर्यटकांना आज ही पर्वणी मिळाली. पट्टेदार वाघ ही ताडोबाची ओळख आणि अभिमान आहे. आज त्याच वाघाने मनसोक्त दर्शन दिल्याने सात महिन्यांचा कोरोना काळही पर्यटक क्षणभरासाठी विसरून गेले असतील, यात दुमत नाही. ताडोबातल्या कोअर झोनमध्ये हे दृश्य बघायला मिळाले. रस्त्यावरून ऐटीत चालणाऱ्या या वाघाने पर्यटकांना एक वेगळाच आनंद दिला. सहा महिन्यांपासून पर्यटकांचा इथे पत्ता नव्हता. प्रकल्प सुरू झाल्याने शनिवारी वाघांनाही बऱ्याच दिवसांनी माणूस बघता आला.
पाहा व्हिडीओ-




























































