Video – दोन वाघांची जोरदार लढाई, व्हिडीओ व्हायरल

जेव्हा दोन वाघांची झुंज होते तेव्हा त्याची गर्जना संपूर्ण जंगलात ऐकू येते. सहसा वाघ हे आपल्या भूभागाचे रक्षण करण्यासाठी लढतात, ज्यात अनेकवेळा वाघांचा मुत्यूही होतो.

सध्या सोशल मीडियावर अशीच दोन वाघांची झुंज होत असलेला व्हिडीओ व्हायरल होत आहे. राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील रणथंबोर राष्ट्रीय उद्यानामधील हा व्हिडीओ आहे. 12 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये हे दोन वाघ एकमेकांना मारहाण करताना दिसत आहेत. यांची गर्जना ऐकून तुम्हाला समजेल की झुंज किती घातक आहे.

हा व्हिडीओ ट्विटर वापरकर्ते @WildLense_India ने शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘काही झुंज घातक असतात. भूभागासाठी होणाऱ्या लढाया देखील वाघांच्या मृत्यूचे एक कारण आहे.’ या व्हिडीओत तुम्ही या दोन वाघांना लढताना पाहू शकता. लढाई दरम्यान, त्याची गर्जना एकूण कोणालाही थरकाप उडू शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या