मतदानासाठी तगडा पोलीस बंदोबस्त, गडचिरोलीत करणार ड्रोनचा वापर

281

विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे. 3 लाख पोलीस आणि सीआयएसएफच्या 350 तुकडय़ा संपूर्ण राज्यात तैनात असणार आहेत. गडचिरोलीत पोलीस ड्रोनचा वापर करणार आहेत.

विधानसभेकरिता सोमवारी मतदान होत आहे. मतदानाच्या दिवशी अनुचित घटना घडू नयेत म्हणून पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे. संपूर्ण राज्यात एकूण 2 लाख महाराष्ट्र पोलीस, होमगार्ड आणि 350 सीआयएएसएफच्या तुकडय़ा तैनात केल्या आहेत. मतदान केंद्र ते स्ट्राँग रूमपर्यंत पोलिसांची कडेकोट सुरक्षा असणार आहे. नक्षलग्रस्त भागात पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. ड्रोनच्या माध्यमातून पोलीस नजर ठेवून असणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या