दहिसर विद्या मंदिरला लेझीमचे अजिंक्यपद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

शासनाच्या शिक्षण निरीक्षण बृहन्मुंबई आर पूर्व विभाग लेझीम स्पर्धेत दहिसर विद्या मंदिरचे लेझीम पथक आठव्यांदा बक्षीसपात्र ठरले आहे. विभागातल्या शाळांवर निर्विवाद वर्चस्व गाजवत यंदाही विद्या मंदिरने लेझीमचे अजिंक्यपद पटकावले आहे.

या लेझीम पथकामध्ये साक्षी चाफेकर, आचल मोरे, हिमांशी म्हात्रे, संजना रेडेकर, सिद्धी कळंबटे, अनुजा जाधव, राधिका जाधव, रिया भुवड, श्रेया गवळी, नेहा टंकसाळी, ऋतुजा तरंगे, विशाखा भालेराव, यांच्यासह ४० विद्यार्थ्यांच्या सहभाग होता. या पथकाला शाळेचे क्रीडा प्रमुख, लेझीम पंच आणि प्रशिक्षक विठ्ठल सुळे यांच्या हलगीची साथ लाभली. तसंच, रेखा वाळिंजकर, श्वेता संखे या दोन शिक्षिका आणि विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक सुधीर देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.