“विजय दिवसा”निमित्त कराडमध्ये शोभायात्रा, शस्त्रप्रदर्शन, माजी सैनिक मेळावा

22

सामना प्रतिनिधी । कराड

विजय दिवस समारोह उद्या शुक्रवारपासुन प्रारंभ होत आहे. त्याची जयत्त तयारी करण्यात आली आहे. सैन्यदलाचे जवान, शस्त्रेही त्यासाठी कराडमध्ये दाखल झाले आहेत. यंदाच्या समारोहात सैन्यदलातील जवानांच्या कसरतीसह पुरस्कार वितरण व अन्य कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. उद्या शोभायात्रा, शस्त्रास्त्र प्रदर्शन, माजी सैनिकांचा मेळाव्य़ाचे आयोजन करण्यात आले आहे. विजय दिवस समारोह दरवर्षी निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा केला जातो.

यंदाही दिमाखात विजय दिवस साजरा होण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. यंदाचे समारोहाचे २१ वे वर्ष आहे. समाहोरात सैन्य दलांच्या कसरतींचे आकर्षण असणार आहे. त्याचबरोबर उद्या सकाळी नऊ वाजता शोभा यात्रा होणार आहे. विजय दिवस चौकामध्ये नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, जेष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, डॉ. अशोकराव गुजर, शहर पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या उपस्थितीत त्यास प्रारंभ होईल. त्यानंतर सकाळी अकराव वाजता शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे लिबर्टी मजदुर मंडळाच्या मैदानावर उदघाटन होईल. विठ्ठल रुक्मीणी देवस्थान समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, तहसीलदार राजेंश चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शिक्षण मंडळाचे सचिव चंद्रशेखर देशपांडे, नगरसेवक विजय वाटेगावकर, सौरभ पाटील हे उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजता माजी सैनिकांचा मेळावा येथील वेणुताई चव्हाण सभागृहात होईल. त्यास प्रांताधिकारी हिंम्मत खराडे, पोलिस उपाधिक्षक नवनाथ ढवळे, तहसीलदार राजेश चव्हाण, जिल्हासैनिक कल्याण अधिकारी आर. आर. जाधव उपस्थित राहतील. समारोहाअंतर्गत उद्या सायंकाळी साडेसहा वाजता वेणुताई चव्हाण सभागृहात सांस्कृतीक कार्यक्रम होईल.राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, प्रांताधिकारी श्री. खराडे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, एसजीएम काॅलेजचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाश पाटील, उद्योजक सलीम मुजावर, नगरसेविका श्रीमती शारदा जाधव यांच्या उपस्थितीत मिनल ढापरे यांचा सांस्कृतीक कार्याबद्दल, सैन्य दलात अधिकारी पदावर रुजु झालेबद्दल हर्षवर्धन मोहिते, खेळाडु रोहिणी मोहिते, केदार गायकवाड यांचाही विशेष सत्कार होईल. गणराया अॅवार्डचेही वितरण त्याच कार्यक्रमात होईल.समाहोरासाठी कालपासुन सैन्यदलाचे जवान दाखल होण्यास प्रारंभ झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या