तोडफोड फटकेबाजीचा डबल धमाका; IPL मध्ये धुरळा उडणार! 21 वर्षीय खेळाडूची तुफान फलंदाजी

विजय हजारे ट्रॉफीमध्ये 21 वर्षीय फलंदाजाने सर्वांनाच चकीत केले आहे. आज (6 डिसेंबर 2025) बंगालविरुद्ध हैदराबाद सामन्यात चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. 21 वर्षीय अमन राव पेरालाने तोडफोड फटकेबाजी करत गोलंदाजांची धुलाई केली आणि द्विशतक झळकावलं.

प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने आक्रमक सुरुवात केली. अमन राव आणि राहुल सिंग गहलौत या दोन्ही सलामीवारांनी गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरुवात केली आणि पहिल्या विकेटसाठी 104 धावांची भागिदारी केली. अमन रावने 154 चेंडूंचा सामना करत 12 चौकार आणि 13 षटकारांच्या मदतीने नाबाद 200 धावांची झुंजार खेळी केली. तर राहुल सिंग गहलौतने 54 चेंडूंमध्ये 65 धावा चोपून काढल्या. त्यामुळे हैदराबाने बंगलला जिंकण्यासाठी 352 धावा करत 353 धावांचे तगडे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात आव्हानाचा पाठलाग करताना बंगलाच संपूर्ण संघ 245 धावांवर बाद झाला. शहबाज अहमदने 108 धावांनी नाबाद खेळी करत संघाच्या विजयासाठी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र इतर फलंदाजांची साथ न मिळाल्यामुळे संघ पराभूत झाला.

अमन राव परेलाच्या द्विशतकीय खेळीमुळे राजस्थान रॉयलसच्या गोठात नक्कीच आनंदाचे वातावरण निर्माण झाले असावे. राजस्थान रॉयल्सने अमन राव IPL 2026 मिनी लिलाव प्रक्रियेमध्ये 30 लाख रुपयांनी खरेदी केले होते. अमन रावची हीच विस्फोटक फटकेबाजी राजस्थान रॉयल्सह चाहत्यांनी अपेक्षित असावी.