
सामना प्रतिनिधी । मानवत
सुजलाम-सुफलाम, समृध्द महाराष्ट्र घडविण्यासाठी मला तुमच्या आर्शीवादाची गरज आहे. आपला आर्शीवाद मागण्यासाठीच मी येथे आलो आहे, असे शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मानवतमधील विजय संकल्प मेळाव्यात सांगितले. नेहा मंगल कार्यालयात शुक्रवारी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
ही जन आर्शीवाद यात्रा मते मागण्यासाठी नसून गेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी युतीच्या उमेदवारांना भरघोस मतानी निवडून आणले. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि ज्यांची मते मिळाली नाहीत, त्यांचे मन जिंकण्यासाठी आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. ही जन आर्शीवाद यात्रा माझ्यासाठी तीर्थयात्रा आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते तालुक्यातील 24 आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शेतीसाठी खते, बियाणांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, शिवसेना गटनेते चंद्रकांत खैरे, सचिन आहिर, वरुण सरदेसाई, खासदार संजय जाधव, हेमंत पाटील, माजी आमदार मीराताई रेंगे आदी उपस्थित होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश ढगे, जिल्हा युवासेनाधिकारी दिपक बारहत्ते, शिवसेना तालुकाप्रमुख विष्णू मांडे, युवासेना तालुकाप्रमुख संतोष आंबेगावकर, मधुकर निरपणे, पाथरी तालुकाप्रमुख मुंजाभाऊ कोल्हे, सोनपेठ तालुका प्रमुख माऊली कदम, जि.प. सदस्य आप्पा घुमरे, रवींद्र धर्मे, डॉ.जगदीश शिंदे, डॉ. राम शिंदे, प.स. सभापती बंडू मुळे, डॉ.संजय कच्छवे, कृ.उ.बा.स. संचालक माणिक काळे, शहरप्रमुख बालाजी दहे, युवासेना शहरप्रमुख अविनाश दहे, नगरसेवक दत्ता चौधरी, गणेश जाधव, पिंटू निर्वळ, अॅड. सुनील जाधव, उपशहर प्रमुखआप्पा भीसे, माजी शहरप्रमुख अनिल जाधव, नरेश गौड, राम दहे आदींनी परिश्रम घेतले.




























































