
विषारी सापांची तस्करी आणि रेव्ह पाटर्य़ांचे आयोजन केल्याचा गंभीर आरोप असलेला एल्विश यादव हा सध्या फरार आहे. त्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंध असल्याचे समोर आले आहे. य़ावरून सध्या मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठली आहे. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार यांनी देखील यावरून काही गंभीर आोप केले आहेत.
महिलांबाबत अत्यंत अश्लाघ्य भाषेत वक्तव्य करणारा एल्विश यादव हा ड्रग्ज माफिया आहे. तो सध्या मुंबईत लपला असून पोलिसांनी त्याला तत्काळ अटक करावी. पण जर तो मुंबईत लपला आहे तर त्याला कुणीतरी आश्रय देतंय. त्याला कोणाचं आश्रय आहे, अशा लोकांना आश्रय का दिलं जातंय?”, असे सवाल त्यांनी केले आहेत.
‘बिग बॉस’ विजेता यूटय़ूबर एल्विश यादवचे ड्रग्ज रॅकेट नोएडा पोलिसांनी उघडकीस आणले आहे. विषारी सापांची तस्करी, ड्रग्ज पुरवठा आणि रेव्ह पाटर्य़ांचे आयोजन केल्या प्रकरणी नोएडा पोलिसांनी एल्विश आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत 5 तस्करांना अटक करण्यात आली असून एल्विश फरार झाला आहे.


























































