बॉक्सर विजेंदर कॅसिनो जहाजामध्ये लढणार

व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये घवघवीत यश संपादन करणारा हिंदुस्थानचा स्टार बॉक्सर विजेंदर सिंग तब्बल एक वर्षानंतर बॉक्सिंग रिंगमध्ये उतरणार आहे. कोरोनामुळे व्यावसायिक बॉक्सिंगपासून दूर राहणारा विजेंदर सिंग आता 19 मार्चला आपली पुढील लढत खेळणार आहे.

हिंदुस्थानातील गोव्यात ही लढत होणार असून कॅसिनो जहाजामध्ये विजेंदर सिंग प्रतिस्पर्ध्याशी दोन हात करणार आहे. त्याचा प्रतिस्पर्धी कोण असेल याबाबत आगामी दिवसांत घोषणा करण्यात येणार आहे. विजेंदर सिंगने व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये आतापर्यंत एकाही लढतीत पराभवाचा चेहरा पाहिलेला नाहीए. त्याने सलग 12 लढतींमध्ये विजय मिळवले आहेत. यामधील आठ लढती त्याने नॉकआऊट जिंकलेल्या आहेत हे विशेष. याआधी विजेंदर सिंग याने नवी दिल्ली, मुंबई व जयपूर येथे चार लढती खेळलेल्या आहेत. आता हिंदुस्थानात त्याची पाचवी लढत असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या