दोन वर्षापूर्वी चौकशीदरम्यान विकास दुबेने घेतली होते भाजप आमदारांची नावे, खून प्रकरणी दिला होता जबाब

1283

8 पोलीस कर्मचार्‍यांचा खून करून आरोपी विकास दुबे फरार झाला आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे. आता विकास दुबेचे अनेक कारनामे समोर येत आहे. दोन वर्षापूर्वी एका खुन प्रकरणी त्याच्यावर आरोप झाले होते. दुबेने नोंदवलेल्या जबाबात दोन भाजप आमदारंचे नाव घेतले होते. परंतु विकास दुबेशी आपला काहीच संबंध नाही अशी प्रतिक्रिया या आमदारांनी दिला आहे.

आज तकने याबाबत वृत्त दिले आहे. विकास दुबेने आमदार भगवती सागर आणि अभिजीत सिंह यांची नावे घेतली आहेत. दोन वर्षापूर्वी जिल्हा पंचायत निवडणुकीत एका व्यक्तीचा खून झाला होता. विकास दुबेनेच या व्यक्तीचा खून केल्याचा आरोप झाला होता. पण आपला या खुनाशी काही संबंध नाही असे दुबेने चौकशी दरम्यान सांगितले. पोलिसांत त्याने एक ऍफिडेव्हिट सादर केले होते. तेव्हा चौकशीदरम्यान त्याला विचारले की हे ऍफिडेव्हिट बनवताना तुझ्यावर कोणी दबाव टाकला होता का? त्यावर विकास दुबे म्हणाला की दबाव नाही टाकला पण प्रयत्न केला होता त्यात आमदार भगवती प्रसाद सागर, अभिजित सिंह आणि ब्लॉक प्रमुख राजेश कमल आणि जिल्हा पंचायत अध्यक्ष यांनी आपली समजूत घातली असे दुबेने म्हटले. तसेच या लोकांशी आपण संपर्कात होतो,  त्यांच्या भेटी गाठीही होत होत्या असेही दुबेने म्हटले.

भाजप आमदार भगवती सागर म्हणाले की विकास दुबे हा गुन्हेगार आहे. स्वतःला वाचवण्यासाठी तो सत्ताधारी आमदारांचे नाव घेत आहे. आमदार अभिजीत सिंह म्हणाले की विकास दुबे खोटं बोलतोय. त्याच्याविरोधात आपण पोलिसांत तक्रार देणार असेही आमदार सिंह म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या