कुडाळकरांचा भाजपला दे धक्का; शिवसेना प्रवेशाचे संकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि राणे समर्थक विकास कुडाळकर यांची राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी त्यांच्या पिंगुळी येथील निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. विकास कुडाळकर हे भाजपात नाराज असून ते आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसोबत लवकरच शिवबंधनात अडकणार असून जिल्हा भाजपासाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान आपला शिवसेना प्रवेशाचा निर्णय पक्का झाला असून कार्यकर्त्यांशी चर्चा करून लवकरच शिवसेनेत अधिकृतरित्या जाहीर प्रवेश होईल अशी प्रतिक्रिया विकास कुडाळकर यांनी दिली.

पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी शुक्रवारी रात्री विकास कुडाळकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तब्बल दिड तास त्यांच्यात चर्चा झाली. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार वैभव नाईक, संजय पडते, जिल्हा बॅक अध्यक्ष सतीश सावंत, तालुका प्रमुख राजन नाईक, माजी तालुका प्रमुख संतोष शिरसाट, विभाग प्रमुख गंगाराम सडवेलकर आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लवकरच शिवसेनेत अधिकृत प्रवेश
विकास कुडाळकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, होय खर आहे. आपला शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय पक्का झाला आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत व आमदार वैभव नाईक यांनी आपली भेट घेतली. माझ्या कार्यकर्त्यांसमवेत चर्चा करून लवकरच शिवसेनेत माझा अधिकृत प्रवेश होईल