पुणे महापालिका आयुक्तांची बदली, विक्रम कुमार नवे आयुक्त

280

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर काही तासांतच पाच सनदी अधिकाऱयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी नवे पालिका आयुक्त म्हणून महानगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची नियुक्ती पुण्यात साखर आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. पुण्याचे साखर आयुक्त सौरभ राव यांची नियुक्ती पुणे विभागीय आयुक्तालयात विशेष कार्य अधिकारी म्हणून झाली आहे. पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार यांची पुणे महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाल्यामुळे पुण्यातील कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची पुणे महानगर किकास प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर झाली आहे. मंचर उप विभागीय सहाय्यक जिल्हाधिकारी व घोडेगावच्या एकीकृत आदिवासी किकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र दोडी यांची सांगली जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या