लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या विलास केळकर यांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुर्गेश आखाडे, रत्नागिरी

शिक्षकाकडून लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या विलास केळकर (वय-५४ वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी अटक झाल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली होती, ज्यामुळे त्यांना उपचारासाठी तातडीने कोल्हापूरला हलविण्यात आले होते. केळकर यांच्यावर आरोप होता की त्यांनी ३ हजार रूपयांची लाच घेतली होती

शासनमान्य शाळेत काम करणारा सहाय्यक शिक्षक 14 वर्षाच्या सेवेनंतर वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी पात्र ठरला होता. त्या वेतनश्रेणीच्या प्रस्तावावर सही करण्यासाठी शिक्षण विभागाचे लेखाधिकारी विलास केळकर यांनी 3 हजारांची लाच मागितल्याची तक्रार शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला केली होती. यानंतर केळकर यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलं होतं.