
>>डॉ . ज्योती धर्माधिकारी
हलिमा या कामगार चळवळीच्या आघाडीच्या कार्यकर्त्या आहेत. अन्यायग्रस्त कामगारांचा बुलंद आवाज म्हणून हलिमा या त्याकाळी प्रसिद्ध होत्या . त्या अर्थाने त्या कारकीर्दीच्या सुरुवाती पासून लोकप्रिय व्यक्तिमत्त्व ठरल्या . 2012 च्या सार्वत्रिक निवडणुकी नंतर त्यांच्याकडे ‘समाज आणि कुटुंब राज्यमंत्री ’ पद सोपवण्यात आले. त्यांना ‘देशातील सर्वात उल्लेखनीय व्यक्ती ’,‘देशातील उल्लेखनीय स्त्री ’ अशा पुरस्कारांनी भूषवले आहे. कझाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांना नुकता च ‘ऑर्डर ऑफ फ्रेंडशिप’ हा पुरस्कार दिला .
येत्या सप्टेंबरमध्ये सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांचा सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. सिंगापूर म्हणजे आशियाच्या आग्नेय भागात असलेले प्रसिद्ध पर्यटक बेट आहे. देशाचे स्वतचे कुठलेही उद्योग व्यवसाय किंवा अर्थ निर्मिती प्रकल्प नसून पर्यटन हाच तेथील मुख्य उद्योग आहे. आजघडीला हिंदुस्थानमधील तीन क्रमांकाचा गुंतवणूकदार देश म्हणजे सिंगापूर हा छोटासा देश आहे.
मॅडम हलिमा याकूब या ‘लोकप्रिय आणि पात्र’ राष्ट्राध्यक्षां ची निवड सप्टेंबर 2017 मध्ये झाली . निवडच म्हणायला पाहिजे, कारण नियमित निवडणुकीतून आलेले ते पद नाही . 2016 मध्ये राष्ट्राध्यक्षाचे पद हे मलय (मलेशियन ना गरिक) अल्पसंख्याकांसाठी राखीव करण्यात आले. नियमाप्रमाणे निवडणूक लढवण्याचा सगळ्यांना समान अधिकार होता . मलय उमेदवारां मध्ये ही निवडणूक गुणवत्तेच्या आधारे व्हावी अशी अपेक्षा होती . मात्र अंतिम आवेदन पत्र भरता ना केवळ ती नपैकी एकाच उमेदवाराने मलय मुस्लिम असल्याचे पात्रता प्रमाणपत्र सादर केले, साहजिकच निवडणूक न होता या पदावर मिसेस हलिमा याकूब यांच्या नावाचा शिक्का मोर्तब झाला . सिंगापूरच्या पहिल्या महिला आणि देशाच्या आठव्या राष्ट्राध्यक्ष म्हणून मॅडम हलिमा यांनी 14 सप्टेंबर 2017 रोजी पदभार स्वीकारला . येत्या काही महिन्यांत त्यांचा कार्यकाळ संपत आहे. तेव्हा त्यांच्या कार्यकाळाचा हा आढावा.
मॅडम हलिमा याकूब यांचे वडील हिंदुस्दुथानी वंशाचे, तर आई मलेशियन आहे. अगदी बालपणीच वडिलांचा मृत्यू झाल्या नंतर त्यांचे बालपण आईकडे गेले. त्यां चा जन्म (23 ऑगस्ट 1954) सिंगापूरमध्ये झाला. त्यांनी सिंगापूर राष्ट्रीय विद्यापीठामधून वकिली शिक्षणामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. शिक्षण घेत असताना त्यांची त्यांचे पती मोहम्मद अब्दुल्ला अल्हाबशी यांच्याशी ओळख झाली . त्यांना पाच मुले आहेत.
राष्ट्राध्यक्षपदासाठी त्यांनी अपक्ष आवेदन पत्र दाखल केले असले तरी आयुष्यभर त्यांनी पीपल्स अॅक्शन पार्टी या राजकीय पक्षासाठी काम केले. 2001 मध्ये पहिल्यांदा त्यांनी ज्युरोंग येथील निवडणूक लढली . याच वर्षी त्यांच्याकडे ‘समाज विकास, युवक क्रीडामंत्री’ पद सोपवण्यात आले. पदार्पणातच हलिमा याकूब यांच्यावर पक्षाने मोठा विश्वास दाखवला . हलिमा या कामगार चळवळीच्या आघाडीच्या कार्यकर्त्या असून अन्यायग्रस्त कामगारांचा बुलंद आवाज म्हणून हलिमा प्रसिद्ध होत्या . कारकीर्दीच्या सुरुवाती पासून त्या लोकप्रिय व्यक्तिमत्त्व ठरल्या .2012 च्या सार्वत्रिक निवडणुकी नंतर त्यांच्याकडे ‘समाज आणि कुटुंब राज्यमंत्री ’ पद सोपवण्यात आले.
सिंगापूरचे लोकप्रिय पंतप्रधान ली सेन लुंग यांनी त्यांची लोकप्रियता लक्षात घेऊन त्यांना संसद अध्यक्ष नेमले. संसदेमध्ये त्यांनी सातत्याने इराकच्या मुस्लिम कठोरतावादाच्या विरोधात आपली भूमिका मांडली आहे. कट्टरवादी लोक आणि दहशतवादापासून देशाला दूर ठेवण्यासाठी त्यांनी नेहमीच कडक निषेध केला होता. आंतरराष्ट्रीय कामगार समितीच्या उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी कार्य केले. 2015 पर्यंत पीएपीच्या प्रमुख सदस्यांपैकी एक ठरल्या. याच वर्षी त्या मार्शलिंग यू.टी. (नवनिर्मित शहर) येथून निवडणूक लढवून आमदार झाल्या.
2016 मध्ये राष्ट्राध्यक्षपद अल्पसंख्याकांसाठी राखीव उमेदवारांतून घेण्याचे ठरले. बहुसंस्कृती वाद आणि बहुवंशवाद मोडून काढण्यासाठी देशाने उचललेले हे पाऊल होते. राष्ट्राध्यक्षपद राखीव असले तरी ही निवडणूक निकोप वातावरणात आणि गुणवत्तेवर आधारित होईल, अशी अपेक्षा होती. निवडणूक जाहीर होताच मॅडम हलिमा यांनी आमदारकी सोडली, त्याचबरोबर पक्षातील वादापासून दूर राहण्यासाठी त्यांनी पक्षही सोडला. 6 ऑगस्ट 2017 रोजी त्यांनी राष्ट्राध्यक्षपदासाठी आपली उमेदवारी जाहीर केली आणि दुसऱयाच दिवशी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. ‘अ उदद्, अ ऊदूप’ (एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ) हे त्यांचे घोषवाक्य होते. त्यांची उमेदवारी ही नवलाची गोष्ट नव्हती. मात्र पक्षांतर्गत वाद टाळण्यासाठी त्यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी जाहीर करतानाच त्यांनी एक महत्त्वाचे विधान केले होते, ‘सिंगापूर केवळ बहुवंशवादावर बोलतच नाही, तर जसे बोलतो तसे वागतोही. सिंगापूरमधील निवडणुका या गुणवत्तेच्या आधारे होतात. ही निवडणूक ही तशीच असेल.’ निवडणूक होणार हे गृहीत धरूनच मॅडम हलिमा यांनी आपल्या उमेदवारीसाठी नियमित राखून ठेवलेल्या पैशांपेक्षा अधिक पैसा खर्च केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. त्यांना राष्ट्राध्यक्षपद मिळणारच होते, निवडणूक न झाल्याने त्यांच्या निवडीला विनाकारण गालबोट लागले. गुणवत्तेवर निवड न झाल्यामुळे त्यांच्या निवडीवर असंतुष्ट असणाऱयांचा एक गट निर्माण झाला.
सिंगापूरमध्ये राष्ट्राध्यक्ष हे पद शासनाचे प्रमुख पद नाही, सिंगापूरमध्ये संसदीय शासन प्रणाली आहे. संसदेचा प्रमुख हा पंतप्रधान असतो. त्यामुळे राष्ट्राध्यक्षांना औपचारिक आणि मोजकेच अधिकार आहेत.
त्यांच्या कार्यकाळातच कोविडचे दुर्दैवी संकट आले. सिंगापूरची अर्थप्रणाली ही पर्यटन उद्योग आणि सेवा व्यवसायावर आहे. त्यामुळे देशाला अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. देशाचा राखीव निधी खर्च करतानाच नवीन निधी निर्माण होण्याचे सर्व मार्ग बंद झालेले होते. या कठीण काळात मॅडम हलिमा यांनी संयमाने आणि धीराने देशवासीयांना प्रेरणा दिली. आजघडीला सिंगापूर ही मजबूत अर्थव्यवस्था आहे.
मॅडम हलिमा या सुरुवातीपासून लिंग समानतेच्या बाबतीमध्ये आग्रही आहेत. राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी नेदरलँड, ब्रुनेई या देशांशी व्यापार संबंध वाढवले आहेत.
(लेखिका राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय, जालना येथे इंग्रजी विभागप्रमुख आहेत)





























































