प्रसिद्ध गायक विनायक जोशी यांचे निधन

940

डोंबिवलीतील प्रसिद्ध गायक व चतुरंग डोंबिवलीचे प्रमुख कार्यकर्ते विनायक जोशी यांचे इंदूर येथे झोपेतच हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 55 वर्षाचे होते. मेंदीच्या पानावर, सरींवर सरी अशा अनेक कार्यक्रमातून विनायक जोशी यांनी रसिकांच्या मनात अढळपद मिळवले होते. कुंदनलाल सहगल यांच्यावर आधारित ‘बाबूल मोरा’ हा कार्यक्रम, ‘सरींवर सरी’ या कार्यक्रमांमध्ये महत्वाचे योगदान होते. मराठी भावगीतांचा प्रवास उलगडणाऱ्या ‘स्वरभावयात्रा’ पुस्तकाचे लेखनही त्यांनी केले आहे. चतुरंग प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमांच्या आयोजनात त्यांचा सक्रिय सहभाग होता.

आपली प्रतिक्रिया द्या