
माजी आमदार, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूच्या सीआयडी चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर 14 ऑगस्ट रोजी मेटे यांच्या मोटारीला अपघात होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात नसून त्यात घातपात असल्याचा संशय मेटे यांचे नातेवाईक आणि कार्यकर्त्यांनी केला होता. या दुर्घटनेच्या काहीच दिवस आधी एका मोटारीने मेटेंच्या गाडीचा पाठलाग केला होता. याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी सीआयडी चौकशीचे आदेश दिले.



























































