केंद्रीय निवडणूक आयोग भाजपचे बाहुले आहे; विनोद घोसाळकर यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्ष आणि चिन्हासाठी न्यायालयीन लढाई सुरू आहे. लोकशाहीत निर्णयाची अपेक्षा होती. पण निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिले. हे सर्व हुकूमशाहीच्या मार्गाने चाललेले आहे. केंद्रीय निवडणूक आयोग भाजपचे बाहुले आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासहेब ठाकरे)उपनेते विनोद घोसाळकर यांनी कोपरगाव येथे बुधवारी शिवगर्जना अभियानात केली. अभियानाच्या अध्यक्षस्थानी नगर जिल्हा संपर्क नेते बबनराव घोलप होते.

घोसाळकर पुढे म्हणाले,महाशक्तीची ठोकशाही मान्य नाही, शिवसेना (उद्धव बाळासहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे दिल्लीच्या तख्ताला घाबरले नाहीत.आपल्याला जिंकेपर्यंत लढायचे आहे.

उपनेते बबनराव घोलप म्हणाले, या काळात राज्यातील तळागाळातील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे. या शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी या मतदारसंघात शिवगर्जना अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.गावागावात झंझावात पोहचवायचा आहे. हा प्रस्थापितांचा जिल्हा आहे. त्यामुळे जागरूक राहून संकटाला तोंड द्,या असे आवाहन त्यांनी केले.