मतदानाला मुकणार, पण क्रिकेट सुरूच राहणार – विनोद राय

480

सर्वोच्च न्यायालयाकडून नियुक्त करण्यात आलेल्या राजेंद्र लोढा समितीच्या शिफारशी अद्याप स्वीकारलेल्या नाहीत. नव्या घटनांसह निवडणूक घेतलेली नाही अशा संलग्न संघटनांना ‘बीसीसीसीआय’च्या प्रशासकीय समितीकडून थोडा दिलासा मिळाला आहे, नियमांची पूर्तता न करणाऱया संघटनांना बीसीसीआयच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही, पण त्यांच्या क्रिकेटशी निगडित असलेल्या कोणत्याही बाबींमध्ये खंड पडणार नाही. त्यांचा खेळ सुरूच राहणार आहे असे स्पष्ट मत प्रशासकीय समिती प्रमुख विनोद राय यांनी सोमवारी व्यक्त केले. दरम्यान, बीसीसीआयची निवडणूक 22 ऑक्टोबरलाच होणार असल्याचेही विनोद राय यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

  • छत्तीसगड, कर्नाटक व मध्य प्रदेश या तीन राज्यांनी अखेरच्या क्षणी नियमांची पूर्तता करीत निवडणूक मतदान करण्यासाठी पात्रता मिळवली.
  • तामीळनाडू, हरयाणा, अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंड यांनी अद्याप नियमांची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे या चारही राज्यांना मतदानाचा अधिकार नसणार आहे.

एमसीएचे काय होणार

ज्या संघटनांनी आतापर्यंत निवडणूक प्रकिया पूर्ण केलेली नाही त्यांना मोठा धक्का बसू शकतो. मुंबई क्रिकेट असोसिएशननेही (एमसीए) अद्याप निवडणूक घेतलेली नाही. एमसीए, तामीळनाडू, हरयाणा यांना मतदानाला मुकावे लागणार आहे. मात्र या संघटना आता बीसीसीआयची ऍड हॉक कमिटी चालवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या