
सामना ऑनलाईन । मुंबई
राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले असून त्यावरून शनिवार, 4 मे रोजी होणारी एफवायबी कॉमची परीक्षा रद्द झाल्याचा चुकीचा संदेश पाठवण्यात आला आहे. तरी शनिवारी होणाऱ्या सर्व परीक्षा नियोजित वेळेत होणार असून कोणतीही परीक्षा रद्द झालेली नाही, याची कृपया विद्यार्थी आणि पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मुंबई विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.



























































