
हिंदुस्थानात कोणत्याही गोष्टीसाठी जुगाड केला जातो. भरपावसात शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी धावाधाव होते. विद्यार्थी पावसात भिजू नयेत यासाठी एका शाळेने एक खास जुगाड केला असून हा जुगाड सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. पावसात मुले भिजू नयेत यासाठी या शाळेने एक खास टेंट बनवले आहे. याला खाली चार चाके लावली आहेत. या टेंटला शाळेतील शिपाई धक्का देत आहेत. हे हळूहळू शाळेकडे जात आहे. यामुळे विद्यार्थी पावसात भिजत नाहीत. शाळेने बनवलेला हा जुगाड सोशल मीडियावर अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. यावर नेटकऱयांनी भरभरून लाईक, कमेंट्स आणि या व्हिडीओला शेअर केले आहे.