
स्वातंत्र्यदिनी देशभरात देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला. राष्ट्रीय ध्वज हातात घेतलेल्या अनेकांच्या चेहऱयांवर देशभक्तीचा उत्साह ओसंडून वाहत होता. छोटय़ा मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत व्यक्तींच्या हातात, शर्टावर, कार्यालयावर तिरंगा दिसत होता. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक वयोवृद्ध आजोबा भाजी आणण्यासाठी दुकानात येतात. या ठिकाणी एक कंटेट क्रिएटर्स आजोबांना दोन पर्याय निवडण्यास सांगतात. एकामध्ये पैसे होते तर दुसऱया पर्यायामध्ये तिरंगा होता. आजोबांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता तिरंगा ध्वज निवडला. आजोबांच्या या कृतीने सोशल मीडियावर सर्वत्र कौतुक होत आहे. आजोबांच्या देशभक्तीने मन जिंकले, असे नेटिजन्सने म्हटले आहे.