ट्रेंड – लावणी किंग

सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेक जण डान्स करताना दिसून येतात. सध्या असाच एक लावणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण लावणीवर थिरकताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तरुण धरणाच्या शेजारी असलेल्या कट्टय़ावर उभा राहून ‘मला लागली कुणाची उचकी’ या अजरामर मराठमोळ्या गाण्यावर लावणी सादर करताना दिसतोय. त्याच्या डान्स स्टेप्स खूप भन्नाट असून चेहऱयावरील हावभावही अप्रतिम आहेत. त्याचा हा डान्स सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @rajdancer2021 या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत लाखो ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.