
उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील खुखुंडू परिसरात एक अनोखी लग्नाची मिरवणूक पाहायला मिळाली. भाथर मोहल्ला येथील रहिवासी दुर्गेशचे 30 नोव्हेंबर रोजी लग्न होते. दुर्गेश हा व्यवसायाने रोजंदारीवर काम करणारा कामगार आहे. त्याच्या वडिलांचे निधन झाले होते, त्याच्याकडे लग्नाच्या वरातीत घेऊन जायला गाडी नव्हती, व्यवस्था करण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते, त्यामुळे त्याच्या मित्रांनी आर्थिक मदत केली आणि वरातीसाठी सुमारे 30 ई-रिक्षा तयार केल्या आणि त्यानंतर दुर्गेशची लग्नाची वरात ई-रिक्षाने नेण्यात आली. गावकरी आणि ये-जा करणाऱयांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट @WDSiddiqui2011 या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे.


























































